

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणात (यशवंत सागर) सध्या 91 .72 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण लवकरच शंभरी गाठेल या आशेने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उजनी धरण मागील तीन वर्षात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले होते.
यंदा पावसाचा जोर कमी असल्याने धरण 100 टक्के भरण्यास विलंब लागला. दौंड व बंडगार्डनहुन पाण्याचा विसर्स वाढल्याने उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या वरील 19 पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसापेक्षा उजनीत पाणी वाढले आहे. उजनीत 112. 79 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यातील 49. 14 टीएमसी हा उपयुक्त पाणीसाठा आहे. वीर धरणामधुन निरा नदीत 23185 क्यूसेक सोडण्यात आले आहे.
उजनीची पाणीपातळी खालीलप्रमाणे
एकूण पाणीपातळी 496 .450 मी.
एकूण पाणीसाठा 112 .79 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा 49 .14 टीएमसी
टक्केवारी 91 .72 टक्के
दौंड विसर्ग 13233 क्यूसेक
बंडगार्डन विसग 11731 क्यूसेक
सिना माढा बोगदा 259 क्यूसेक
दहीगाव उपसा सिंचन 43 क्यूसेक
मुख्य कालवा 500 क्यूसेक