पुणे : पैसे परत न मिळाल्याने तरुणीची आत्महत्या | पुढारी

पुणे : पैसे परत न मिळाल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे : उसने दिलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रणीत दत्तात्रय जगताप-पाटील (रा. परंडा, जि. उस्मानाबाद) या तरुणावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐश्वर्या सुरवसे (28) हिने 15 जानेवारी 2022 रोजी आत्महत्या केली होती. हा प्रकार खराडी येथील व्हिजलन होम येथे घडला होता. याबाबत मुलीचे वडील बालाजी मरिबा सुरवसे (48, रा. दत्तनगर, तेरना कॉलेज, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

 

 

 

 

 

Back to top button