पुणे : राजगुरुनगरला एकाच रात्रीत सहा ठिकाणी चोरी | पुढारी

पुणे : राजगुरुनगरला एकाच रात्रीत सहा ठिकाणी चोरी

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाडारोड परिसरात बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (दि. 8) घडली.

याबाबत कुणाल नटवरलाल रावळ (रा. शिवसाम्राज्य सोसायटी वाडारोड, राजगुरूनगर, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याच परिसरात आणखी पाच ठिकाणी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावळ हे फ्लॅटला कुलूप लावून जुन्या घरी देवाचा कार्यक्रम असल्याने नेहरू चौक येथे कुटंबासह गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील 17 हजार पाचशे रुपयांची रोकड, एक लाख रुपायांची सोन्याची चेन लांबवली. तसेच याच परिसरात मिलिंद शांताराम पवळे यांच्या फ्लॅटचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिद्धेश्वर नगरी येथील सचिन शांताराम साबळे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडत असताना शेजारील गोविंदा रामचंद्र शिंदे हे जागे झाले. चोरट्यांनी त्यांच्या कपाळावर दगड मारून जखमी करून पळून गेले.

कुमारपार्क या सोसायटीत राहणारे वसंत किसन दराडे यांचा खोलीचा दरवाजा तोडून चोरी झाली. राजगुरुनगर न्यायालयाच्या मागे महालक्ष्मी कॉम्पलेक्समधील बलभीम शिवाजी राळे याचे बंद फ्लॅटचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरी झाली. त्यातील ऐवजाचा तपशील मिळू शकला नाही.

Back to top button