पुनावळेतील रस्त्यावर पाणीच पाणी | पुढारी

पुनावळेतील रस्त्यावर पाणीच पाणी

ताथवडे : ताथवडे व पुनावळे परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार चालू आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली. पुनावळे येथील पांढरेवस्तीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दुतर्फा मोठ्या प्रमाणावर उच्चभ्रू सोसायट्या आहेत. अनेक मोठे प्रकल्प या ठिकाणी चालू असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.

सततच्या पावसामुळे येथील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे येथील बाजूलाच असलेल्या सोसायटीधारकांना बाहेर पडताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सोसायटी गेटच्या समोरच गुडघाभर पाणी साचल्याने येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील काही भाग सखल असल्याने येथे सतत पाणी साचते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Back to top button