पुणे : नोकरीचे आमिष पडले दहा लाखांना, महिलेने घातला 9 ते 10 जणांना 10 लाख 55 हजारांचा आर्थिक गंडा | पुढारी

पुणे : नोकरीचे आमिष पडले दहा लाखांना, महिलेने घातला 9 ते 10 जणांना 10 लाख 55 हजारांचा आर्थिक गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदेशात पोलंड येथे वर्क परमिट प्राप्त करून देऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेने 9 ते 10 जणांना 10 लाख 55 हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाना पेठेतील एका 31 वर्षांच्या तरुणाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयूरी श्रीवास्तव नावाच्या तरुणीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार 28 मे 2021 ते 28 मार्च 2022 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इंटरनेटवर परदेशात नोकरीच्या संधी शोधत होते. त्या वेळी मयूरी श्रीवास्तव या तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधला व पोलंडमध्ये वर्क परमिट प्राप्त करून नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. वर्क परमिटच्या बिझनेसमध्ये सामील होण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी व इतर नऊ ते 10 जणांकडून वेळोवेळी 10 लाख 55 हजार 791 रुपये घेतले.

मात्र, खूप मोठा कालावधी लोटला, तरी त्यांना कोणालाही ठरल्याप्रमाणे नोकरी न लावता तसेच व्हिसा न देता खोटे अ‍ॅग्रीमेंट तयार करून त्यांना पाठविले व त्यांची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साठे तपास करीत आहेत.

 

Back to top button