पिंपरी : पोस्टाचे कर्मचारी आज संपावर | पुढारी

पिंपरी : पोस्टाचे कर्मचारी आज संपावर

पिंपरी : डाक मित्र योजना व कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून टपाल खात्याच्या खासगीकरणाचे धोरण थांबवा. तसेच बचत बँक योजनांचे ‘आयपीपीबी’मध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करा, आदी मागण्यांसाठी पोस्ट कर्मचारी बुधवारी (दि.10) एक दिवस संपावर जाणार आहेत. या संपात पिंपरी चिंचवडमधील पोस्टाचे साडेचारशे कर्मचारी सहभागी होणार आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज रिजनल सेक्रेटरी के. एस. पारखी यांनी ही माहिती दिली.

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्पलॉइज व टपाल कर्मचारी संयुक्त कृती समितीने ही संपाची हाक दिली आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करा सर्व कर्मचार्‍यांना जुनी पारंपरिक पेन्शन योजना लागू करा. टपाल खात्यातील रिक्त जागा त्वरित भरा. कोविडमुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये भरपाई यासह इतर मागण्यांसाठी हा संप आहे, असेही पारखी यांनी सांगितले.

Back to top button