पिंपरी : पाणी सांडल्याने महिलेला मारहाण करून पंधरा फूट उंचीवरून ढकलून दिले | पुढारी

पिंपरी : पाणी सांडल्याने महिलेला मारहाण करून पंधरा फूट उंचीवरून ढकलून दिले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दुकानात पाण्याचा ग्लास सांडल्याने चायनीज सेंटर चालकाने महिलेला बेदम मारहाण केली. तसेच, तिला 15 फूट उंचावरून ढकलून दिले. ही घटना 15 जुलै रोजी चिखली येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.8) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सोहेल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आरोपीच्या चायनीज सेंटरमध्ये चायनीज पदार्थ खात होत्या.

त्यावेळी एका मुलाकडून दुकानातील पाण्याचा ग्लास सांडला. दरम्यान, फिर्यादी महिलेने पाण्याचा ग्लास सांडवल्याचा गैरसमज झाल्याने आरोपीने त्यांना मारहाण करीत बाहेर हाकलून दिले. त्यानंतर महिला घरकुलच्या दिशेने जाणार्‍या उड्डाणपुलावर रडत असताना आरोपीने तेथे जाऊन त्यांना पंधरा फूट उंचावरून खाली ढकलून दिले.

Back to top button