पिंपळे गुरव : बाजारात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दाखल

पिंपळे गुरव : बाजारात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दाखल

पिंपळे गुरव : गणेशोत्सव काही दिवसांवर आल्यामुळे परिसरात गणेशमूर्तीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. अनेक नागरिक मूर्ती बूक करताना दिसत आहेत. यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती जास्त तयार केल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. पिंपळे गुरव येथील मूर्तिकार गेल्या सहा महिन्यांपासून पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती बनवत असून, भाविकही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी करण्यापेक्षाया मूर्ती बूक करताना दिसत आहेत.

मागील सहा महिन्यांपासून विनायक उभे हे गणेशमूर्ती तयार करत आहेत. उभे यांनी सांगितले, की मूर्ती कला शिकण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक येत असतात. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्यामुळे गणेशमूर्ती मोठी घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. लॉकडाउन हटविण्यात आल्यामुळे या वर्षी गणेशमूर्ती बनवण्यासाठी कच्चा मालात वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती, रंग यांच्या दरात वाढ झाली आहे. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबाग, शंकराच्या अवतारातील मूर्ती आणि विविध फुलांमध्ये विराजमान असलेल्या मूर्ती बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.

शाडू मातीच्या गणेशमूर्ती पाचशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. तर, पीओपो गणेशमूर्ती 300 पासून तीन हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत.

                                                    – विनायक उभे, मूर्तिकार, पिंपळे गुरव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news