महापालिका वाटणार पाच लाख झेंडे मोफत; शासनाकडून आलेले काही झेंडे सदोष

महापालिका वाटणार पाच लाख झेंडे मोफत; शासनाकडून आलेले काही झेंडे सदोष

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या 'हर घर तिरंगा' या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने शहरात किमान पाच लाख तिरंगा झेंड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 'हर घर तिरंगा' हा उपक्रम सर्वत्र राबवला जात आहे. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या पुरवठादारांकडून हे ध्वज विकत घेऊन ते नागरिकांना वितरित करायचे आहेत.

या उपक्रमासाठी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन तयारीला लागले आहे. त्यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत. पुणे महापालिकेने दहा ते बारा पुरवठादारांकडून पाच लाख तिरंगा ध्वज मागविले आहेत. याशिवाय शासनाकडूनही अडीच लाख ध्वज आले आहेत. हे सर्व ध्वज नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शुक्रवारपासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

काही ध्वज सदोष
महापालिकेने ठेकेदारांकडून घेतलेल्या आणि शासनाकडून महापालिकेला दिलेल्या काही ध्वजांची छपाई व्यवस्थित झाली नाही, ध्वजावरील चक्र मध्यभागी न छापता कडेला छापले गेले, रंग ओला असताना घडी घातली गेल्याने दोन ठिकाणी चक्र छापले गेले, आकार व्यवस्थित नसणे, सुमार दर्जाचे कापड, शिलाई व्यवस्थित नसणे, अशा अनेक त्रुटी आढळून आल्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news