पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: हुक्का विक्रीप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 6) दुपारी द स्मोक शॉप, शिंदेनगर, बावधन येथे ही कारवाई करण्यात आली. दुकानचालक आशिर इब्राहिम मोहम्मद (23, रा. कोथरूड), दुकान मालक रमीज अजीज कलनांडी (24, रा. खेड शिवापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सचिन बेंबळे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी दुकानात देशी, विदेशी कंपनीचे हुक्का फ्लेवर विक्रीसाठी ठेवले. तसेच, हुक्क्याच्या पाकिटांवर वैधानिक इशारा, हुक्का फ्लेवर तयार केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख अशी कोणतीही माहिती नव्हती. याबाबत माहिती मिळाल्याने हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून 41 हजार 84 रुपयांचा हुक्का फ्लेवर जप्त केला आहे.