‘विद्युत बिला’च्या विरोधात वीज कर्मचारी, अभियंते यांचा बहिष्कार | पुढारी

‘विद्युत बिला’च्या विरोधात वीज कर्मचारी, अभियंते यांचा बहिष्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘विद्युत बिला’च्या विरोधात वीज कर्मचारी, अभियंते यांनी बहिष्कार घालत आंदोलन सुरू केले आहे. केन्द्रीय ऊर्जा मंत्रालयाने देशांतील ऊर्जा उद्योगाचे सर्रास खासगीकरण करून कॉर्पोरेट घराणे यांना सोपवण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांच्या नफ्यात वाढ व्हावी, यासाठी वीज कायदा 2003 मध्ये नव्याने 32 संशोधन प्रस्तावित करून विद्युत (संशोधन) बिल 2022, पार्लमेंटच्या मान्सूम सत्रात सोमवारी सादर केले. याच्या विरोधात राज्यातील सर्व वीज कर्मचारी, अभियंते यांनी विरोध केला. तसेच आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती संयुक्त कृती समितीचे भीमा पोहेकर यांनी दिली आहे.

Back to top button