कोथुर्णे येथील पीडित कुुटुंबीयाला 25 हजारांची मदत | पुढारी

कोथुर्णे येथील पीडित कुुटुंबीयाला 25 हजारांची मदत

येळसे : वडगाव येथील स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने कोथुर्णे येथील पीडित कुटुंबीयाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. कोथुर्णे मावळ येथील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायालयीन लढ्यासाठी मदत नव्हे कर्तव्याच्या जाणिवेतून एक हात मदतीचा म्हणून वडगाव येथील स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने रोख रक्कम 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सुनील शिंदे, राजेंद्र वहिले, मंगेश खैरे, अविनाश कुडे, गणेश पं.ढोरे, शंकर ढोरे, अनिकेत भगत, या दुर्दैवी घटनेमुळे स्वराच्या कुटुंबीयांवर आलेले दुःख हे फक्त त्यांच्या पुरते नाही तर आज समाजातील प्रत्येक कुटुंबाला हे दुःख झाले आहे. सांत्वन करणे, मानसिक आधार देणे हे आपले कर्तव्यच आहे; परंतु चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी मदत नव्हे कर्तव्य या जाणिवेतून म्हणून मदत देण्यात आली असल्याचे पंढरीनाथ ढोरे यांनी सांगितले.

Back to top button