पुणे : पळसदेवला बारा वर्षांपासून बसथांबा शेड नाही | पुढारी

पुणे : पळसदेवला बारा वर्षांपासून बसथांबा शेड नाही

 पळसदेव, पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावरील पळसदेव (ता. इंदापूर) येथे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बसथांबा शेड नसल्याने प्रवासी, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. ‘पळसदेवला बसथांबा शेड देता का शेड’ अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

दहा-बारा वर्षांपूर्वी महामार्ग रुंदीकरणात येथील बसथांबा पाडण्यात आला तो अद्याप बांधण्यात आला नाही. पळसदेव गावामध्ये 33 वाड्या-वस्त्या, छोट्या गावांचा समावेश असलेले मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शाळा-कॉलेज, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य आदी सर्व सुविधांनी सज्ज असलेले गाव असल्याने गावाबाहेरील व वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची सातत्याने गावात वर्दळ असते. प्रवाशांचीही मोठी संख्या असते. कित्येक तास बसथांब्यावर गाडीची वाट पाहत थांबावे लागते.पावसाळ्यात प्रवाशांचे शेडअभावी फार हाल होतात. अचानक पाऊस आल्यास नजीकच्या हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Back to top button