गुलटेकडी मार्केट यार्ड फुलबाजारात फुलांची चलती | पुढारी

गुलटेकडी मार्केट यार्ड फुलबाजारात फुलांची चलती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांची आवक वाढली असून, श्रावण महिन्यातील सणवारांमुळे मागणीही चांगली आहे़ झेंडूच्या भावात घसरण झाली असून, इतर फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून गणेशोत्सव सुरू होणार असून, अनेक शेतकर्‍यांनी झेंडूच्या लागवडीचे प्रमाण वाढविले आहे.

त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच झेंडूचे दर घसरले असून, त्याचा ग्राहकांना सध्या फायदा होत आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-20, गुलछडी : 120-200, अ‍ॅष्टर : जुडी 20-30, कापरी : 30-40, शेवंती : 60-100, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-30, गुलछडी काडी : 10-30, डच गुलाब (20 नग) : 50-120, जर्बेरा : 30-50,
कार्नेशियन : 300-600, मोगरा : 300-600.

Back to top button