पिंपरी : शहरातील रिक्षा संघटनांची भाडेवाढ करण्याची मागणी

पिंपरी : शहरातील रिक्षा संघटनांची भाडेवाढ करण्याची मागणी

पिंपरी : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अ‍ॅटोरिक्षा भाडेदरात वाढ करण्यासाठी पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिक्षा संघटनांनी भाडे वाढ करण्याची मागणी केली. या वेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, संजय भोर, रिक्षा व ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. महागाई वाढल्यामुळे भाडे वाढ होणे गरजेचे आहे.

सीएनजीच्या दरामध्ये व महागाईच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे खटुआ समितीच्या अहवालानुसार भाडेवाढीची मागणी संघटनांकडून करण्यात आली. तसेच, पहिल्या किलो मीटरसाठी 27 रूपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटर पाठीमागे 18 रूपये भाडेवाढ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्यावतीने हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी बाबा कांबळे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news