पिंपरी : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने एकास मारहाण | पुढारी

पिंपरी : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने एकास मारहाण

पिंपरी : एका व्यक्तीने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने सहा जणांनी मिळून त्याला या क्षुल्लक कारणांवरून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार दि. (5 रोजी) मोशी येथील नागेश्वर नगर येथे घडली आहे. निलेश सोपान तळेकर (वय 35, रा. नागेश्वर नगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल तोत्रे (वय 27), गणेश तोत्रे (वय 29), अजय मुंढे (वय 19, सर्व रा. नागेश्वर नगर, मोशी), शुभम साबळे (वय 25, रा. शिवाजीवाडी) आणखी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोर थांबले असताना त्यांनी आरोपी गणेश याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यावरून गणेश आणि फिर्यादी यांच्यात किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी अतुल याने फिर्यादी यांना सोसायटीच्या गेटच्या बाहेर बोलावून अंगावर धावून मारहाण केली. अन्य आरोपींनी फिर्यादीला पाईपने मारहाण करून जखमी केले. शुभम साबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button