भारतीय सफरचंदाची बाजारात दमदार एंट्री | पुढारी

भारतीय सफरचंदाची बाजारात दमदार एंट्री

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाजार पेठांमधून परदेशी (इंम्पोटेड) सफरचंद गायब झाले असून, भारतीय सफरचंदाची बाजारात दमदार एंट्री झाली आहे. दर कमी असल्याने नागरिकांचा भारतीय सफरचंद खरेदीचा कल वाढला आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या न्युझिलंड, तुर्की, ईरान, साऊथ आफ्रिका येथील परदेशी सफरचंदाचे दर भारतीय सफरचंदाच्या दराहून अधिक आहेत. त्यामुळे परदेशी सफरचंदाची विक्री कमी होत होती.

मात्र आता भारतीय सफरचंदाचा हंगाम सुरू झाला असून, बाजार पेठांत शिमला येथील सफरचंद सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

परदेशी सफरचंदाचा हंगाम आता संपत आला असून त्याचे दरही वाढलेले आहेत. भारतीय सफरचंद बाजारात दाखल झाले आहेत. त्याचा दर हा परदेशी सफरचंदापेक्षा कमी असल्याने त्यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
                                                              – मनोज मुलाणी, फळविक्रेते,पिंपरी.

Back to top button