पुणे : मौजमजेसाठी सोनसाखळी चोरी करणारा अटकेत | पुढारी

पुणे : मौजमजेसाठी सोनसाखळी चोरी करणारा अटकेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मौजमजेसाठी सोनसाखळी चोरी करणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-1 ने सापळा रचून अटक केली. कर्वेनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. प्रवीण मधुकर डोंगरे (वय 23, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी कर्वेनगर परिसरातील शाहू कॉलनी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार डोंगरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता 1 ऑगस्ट रोजी गिरिजा शंकर सोसायटी येथे एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस अंमलदार नितीन कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पिस्तूल आणि काडतूस जप्त
खंडणी विरोधी पथक-1 ने पेट्रोलिंग करीत असताना कात्रज तळ्याजवळ एक जण संशयितरीत्या फिरत असताना दिसला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या जवळून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. संकेत मिलिंद गोवेकर (वय 22, रा. कोरेगाव, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, सहायक पोलिस फौजदार मधुकर तुपसौंदर, प्रमोद सोनावणे, गजानन सोनवलक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button