लोणारवाडी येथे महिलेचा विनयभंग, दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

लोणारवाडी येथे महिलेचा विनयभंग, दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

देऊळगाव राजे : लोणारवाडी (ता. दौंड) येथे शनिवारी सायंकाळी एका 34 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या ओळखीचा इसम नवनाथ जगताप (रा. मलठण, ता. दौंड) हा खडकीकडे जात होता. त्याने पीडित महिलेला ‘तुला खडकीला सोडतो,’ असे सांगून दुचाकीवर बसविले.

पुढे जाऊन दुचाकी खडकीकडे न नेता कॅनॉल रोडने वळवली. महिलेने ‘इकडे कुठे घेऊन चालला?’ अशी विचारणा केली असता ‘इकडेच आपले काम आहे’ म्हणत गाडी तशीच पुढे नेली. सदर महिलेने धोका ओळखून गाडीवरून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने महिलेला पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे दौंड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button