मुलाला कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल | पुढारी

मुलाला कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल

पुणे : जर्मन शेफर्ड कुत्र्याने 9 वर्षीय मुलाचा चावा घेतल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. वतन कांबळे (वय 55) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुधांशू गुप्ता (वय 39, रा. बाणेर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पोर्शिया पल्लोड फर्म, बाणेर रोड येथील सोसायटीमधील लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर घडला. फिर्यादी यांचा 9 वर्षांचा मुलगा सोसायटीच्या बागेत खेळत होता. जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा रहिवासी परिसरात जवळ ठेवण्यास कायद्याने मनाई असतानादेखील आरोपीने तो बाळगला आहे.

Back to top button