येरवडा : विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळी | पुढारी

येरवडा : विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळी

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शिवराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 75 अंकाची मानवी साखळी तयार केली. प्रशालेतील विद्यार्थी विविध उपक्रमांतून स्वराज्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. शाळेतील 75 गरीब विद्यार्थ्यांना छत्री वाटप, 75 गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 175 वृक्षप्रेमी पालकांना वृक्ष वाटप, हर घर झेंडा अभियानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी परिसरात प्रभात फेरी काढली होती. यावेळी देशभक्तीचे विविध घोष वाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते.

चित्रकला, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा या वेळी घेण्यात आल्या. 75 गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटण्यात आली. लोकजागृती करण्यासाठी पालक मेळावा घेऊन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबवण्यासाठी पालकांना यावेळी मेळाव्यात आवाहन संस्थेच्या सचिव गीताताई साळुंखे यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, मुख्याध्यापक सी. जी. वाघमारे (माध्यमिक), वंदना पठारे (मुख्याध्यापिका) यांनी विशेष मार्गदर्शन केले.

 

Back to top button