पुणे : टीबी रुग्ण 1 लाख 34 हजार; सात महिन्यांतील आकडेवारी | पुढारी

पुणे : टीबी रुग्ण 1 लाख 34 हजार; सात महिन्यांतील आकडेवारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात क्षयरोगाच्या नोंदींमध्ये सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीत क्षयरोग रुग्णांच्या नोटिफिकेशनची गती वाढली आहे. सात महिन्यांत राज्यभरात 1 लाख 34 हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. भारतातील एमडीआर टीबीचे प्रमाण जगाच्या तुलनेत भारतात 26 टक्के, तर मृत्युदर 36 टक्के इतका आहे. 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे आहे. सन 2025 पर्यंत ङ्गक्षयरोगमुक्त महाराष्ट्रफचे ध्येय गाठायचे आहे.

त्यासाठी धोरणांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रम आघाडीवर आहे. कोरोना काळात क्षयरोग सेवांवर बराच परिणाम झाला होता. मात्र, आता पुन्हा क्षयरोगावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. आर.एस.आडकेकर म्हणाले, ङ्गपूर्वी रुग्णांचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जात असत. आता आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञान असलेली 150 ट्रू नॅट मशीन मिळाली आहेत. या मशीनची अचूकता कितीतरी पटींनी जास्त आहे. सूक्ष्मदर्शकाखाली 25 रुग्णांचे नमुने तपासले असता, एखादा पॉझिटिव्ह रुग्ण मिळतो. आता क्षयरोग वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे क्षयरोगाचा रिअल टाइम डेटा लवकरात लवकर उपलब्ध होणे शक्य झाले आहे.

आकडे काय सांगतात?
वर्ष – क्षयरोग रुग्ण नोंदणी
2020 – 1 लाख 60 हजार
2021 – 2 लाख 2 हजार
2022 – 1 लाख 34 हजार
(जानेवारी ते जुलै)

आतापर्यंत क्षयरोग रुग्णांची नोंदणी जिल्हानिहाय होत होती. आता तालुकानिहाय नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

                                            – डॉ. एस. आर. आडकेकर, राज्य क्षयरोग अधिकारी

Back to top button