पिंपरी : विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

पिंपरी : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 26 एप्रिल 2016 ते 4 ऑगस्ट 2022 या कालावधीत मोरेवस्ती चिखली, भोईवाडा मुंबई, फलटण, सातारा येथे घडला. याप्रकरणी 33 वर्षीय विवाहितेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती, सासू, सासरे, नणंद आणि नणंदेचा पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पतीने फिर्यादी महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच, लग्नात दिलेले सोन्याचे दागिने सासूने स्वतःकडे ठेवून घेतले. तुला स्वयंपाक येत नाही. तुला आमच्याकडे मोलकरीण म्हणून राहावे लागेल. माहेरहून हुंडा घेऊन ये, असे म्हणून सासू, सासरे, नणंद आणि नंदावा यांनी विवाहितेला त्रास दिला. दरम्यान, आरोपी सासर्‍याने विवाहितेसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button