पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोन ठिकाणी कारवाई | पुढारी

पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोन ठिकाणी कारवाई

पिंपरी : गुटखा विक्री प्रकरणी शहर परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निगडी आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये पोलिसांनी 24 हजारांचा गुटखा जप्त केला. याबाबत पोलिस हवालदार सतीश ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल नामदेव रिठे (30, रा. ओटास्किम, निगडी), राहुल नारायण हुलसुरे (30, रा. रूपीनगर, तळवडे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर थांबले असून त्यांच्याकडे गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्याकडून 13 हजार 140 रुपयांचा गुटखा आणि 40 हजार रुपयांची दुचाकी जप्त केली. आरोपी राहुल याने विशाल याला गुटखा विक्रीसाठी पुरवल्याचे समोर आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत. दुसर्‍या कारवाईत पोलिस शिपाई अमित जगताप यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, विनयकुमार अवधनारायण सिंग (34, रा. मारुंजी, ता. मुळशी) आणि रामदेव (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनयकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील ऋषभ पान शॉपमध्ये गुटखा विक्री करीत होते. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये 11 हजार 188 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. आरोपी रामदेव याने विनयकुमार याला विक्रीसाठी गुटखा पुरवल्याचे चौकशीत उघड झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button