मोरगाव : जिल्ह्यातील कामांना स्थगिती नाही : पवार | पुढारी

मोरगाव : जिल्ह्यातील कामांना स्थगिती नाही : पवार

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा: नव्या सरकारने राज्यातील अनेक विकासकामांना स्थगिती दिली. मात्र, पुणे जिल्ह्यातील कामांना स्थगिती दिलेली नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. शुक्रवारी पवार यांच्या हस्ते मोरगाव येथील 14 कोटी 4 लाख 73 हजार रुपयांच्या कामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न झाले, त्या वेळी ते बोलत होते.

सरपंच नीलेश केदारी, उपसरपंच संदीप नेवसे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, आजी-माजी सरपंच या वेळी उपस्थित होते. उद्घाटन व भूमिपूजनानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर उपसा सिंचन योजनेमार्फत चालविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे. विकासकामे, रस्त्यांबाबत कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगल्या रस्त्याबद्दल नागरिकांनी सांगावे, त्यामुळे आम्हाला समाधान वाटते.

Back to top button