तांदळी ग्रामपंचायतवर श्री भैरवनाथचे वर्चस्व | पुढारी

तांदळी ग्रामपंचायतवर श्री भैरवनाथचे वर्चस्व

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या तांदळी ग्रामपंचायतीवर प्रा. सुभाषराव कळसकर व मच्छिंद्र गदादे यांच्या भैरवनाथ विकास पॅनेलने वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत 11 पैकी तब्बल 10 जागांवर श्री भैरवनाथ विकास पॅनेलने विजय मिळविला. माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांच्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला एक जागा मिळाली.

भैरवनाथ विकास पॅनेलचे विजयी उमेदवार – लक्ष्मण कांबळे, सावता गदादे, रेखा गदादे, मोनिका कळसकर, रेखा कळसकर, आश्रत गदादे, सुभाष कळसकर, सुनीता खोरे, राजश्री खारे, सोनवणे चंद्रकला श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे दत्तात्रय गदादे विजयी झाले.
श्री भैरवनाथ विकास पॅनेलचे व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष कळसकर,म्हणाले की, गेली 15 वर्षांनंतर पुन्हा ग्रामपंचायतीवर आमच्या पॅनेलला सत्ता मिळाली आहे. श्री भैरवनाथ विकास पॅनेलचे नेतृत्व सुभाष कळसकर, मच्छिंद्र गदादे, नामदेव गदादे आदींनी केले.

Back to top button