अकरावी प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस | पुढारी

अकरावी प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत 42 हजार 709 विद्यार्थ्यांपैकी जवळपास निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज (दि.6) अखेरचा दिवस असणार आहे. 317 कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 लाख 11 हजार 430 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

त्यापैकी 86 हजार 791 जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून (कॅप) भरल्या जाणार आहेत. पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीमध्ये 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यातील 24 हजार 718 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी 6 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती.

Back to top button