जेजुरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास शिक्षा | पुढारी

जेजुरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास शिक्षा

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणार्‍या 58 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला होता. या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होती. सदर आरोपीस शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पंधरा वर्षाची कारावासाची शिक्षा व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास भाद्वी 506 खाली 1 वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, 2019 साली जेजुरी जवळील एका गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असणार्‍या विलास बापूराव साळुंखे (वय 58) याने अत्याचार केला होता. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी तपास केला होता.

प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, सरकारी वकील श्रीमती ब्रह्मे यांनी या केसचे काम पहिले. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरु होता. या न्यायालयाचे न्यायधीश के.के. जहागीरदार यांनी आरोपीस दोषी ठरवून पंधरा वर्षाची कारावासाची व पंचवीस हजार रुपयाची दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Back to top button