पिंपरी : आठवडाभरानंतर पावसाची हजेरी | पुढारी

पिंपरी : आठवडाभरानंतर पावसाची हजेरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात पावसाच्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (दि.4) सांयकाळी पावसाला सुरुवात झाली. शहरपरिसर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे वातावरण दमट व कोंदट झाले होते. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी वातावरणात अचानक बदल होवून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कामावरुन घरी परतणा-या  चाकरमान्यांची छत्री व रेनकोट नसल्याने फजिती झाली.

दुचाकीस्वारांना पावसामुळे अर्धेनिम्मे भिजतच घरी जावे लागले. तसेच खरेदीनिमित्त बाहेर पडलेले पावसात अडकून बसले. काहीजणांनी मिळेल त्याठिकाणी आडोसा शोधला. अचानक पाऊस आल्याने रस्त्यावरच्या पथारी व भाजीवाल्याना सामानाची आवराआवर करावी लागली. गेली काही दिवस उकाड्यात वाढ झाली आहे. भरदुपारीदेखील उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात थंडावा निर्माण झाला.

आठवडाभरातील पावसाची नोंद (मि.मी.)
दिनांक पुणे पिंपरी-चिंचवड
28 जुलै 0.0 0.0
29 जुलै 8.6 0.0
30 जुलै 0.0 0.0
31 जुलै 0.0 0.0
1 ऑगस्ट 0.0 0.0
2 ऑगस्ट 0.0 0.0
3 ऑगस्ट 0.0 0.0
4 ऑगस्ट 4.0 4.0

Back to top button