पुणे : गोपीचंद पडळकरांविरोधात पोलिसांत तक्रार | पुढारी

पुणे : गोपीचंद पडळकरांविरोधात पोलिसांत तक्रार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भगवे मफलर गळ्यात टाकून हल्ला केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार व गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पडळकर हे वारंवार बिनबुडाचे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे पक्षाची बदनामी करत आहेत. याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे पक्षाकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, दीपाली धुमाळ, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. पडळकर यांचे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचविणारे आहे. याबद्दल त्यांच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Back to top button