मावळात भाताचे पीक तरारले | पुढारी

मावळात भाताचे पीक तरारले

तळेगाव स्टेशन : मावळ तालुका भातशेतीचे कोठार म्हणून प्रसिध्द आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकर्‍यांनी केलेल्या भात लागवडीमुळे भात पीक तरारू लागले आहे. तालुक्यामध्ये भात लागवड अंतिम टप्प्यात आली असुन मागील 10-12 दिवसांपूर्वी जोरात पाऊस पडत होता आता पावसाची उघडीप झाली असल्यामुळे आणि उन पडत असल्यामुळे भात पीक वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे लागवड झालेले भात पीक तरारले आहे.

परंतु ही उघडीप जास्त दिवस राहणे उपयोगाचे नसून, आता पुन्हा पावसास सुरुवात होणे गरजेचे आहे. अशीच उघडीप राहीली तर भातशेती संकटात येणेची शक्यता आहे. कारण मावळात अजून काही ठिकाणी लावणीचे काम राहिले आहे. लावणीसाठी चिखल कररण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार आहे.

Back to top button