पिंपरी : पत्त्यांच्या क्लबवर छापा; सव्वीस जण अटकेत | पुढारी

पिंपरी : पत्त्यांच्या क्लबवर छापा; सव्वीस जण अटकेत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कंपनीच्या आत सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर छापा मारून पोलिसांनी 26 जणांना अटक केली. त्यांच्याकडून पस्तीस लाख 10 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरोडा विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 2) रात्री दोनच्या सुमारास येलवडी रोड, देहूगाव येथे ही कारवाई केली. शेखर गुलाब परंदवाड (वय 50, रा. माळवाडी, देहू) यांच्यासह 26 जणांना अटक करण्यात आली आहे.

दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक आशिष बनकर यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देहूगाव येथील एसएचइपीएल, हेव्ही इंडस्ट्रीअल फॅबि—केशन लिमिटेड कंपनीच्या आतमध्ये तीन पत्ती जुगार खेळत होते.
याबाबत दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली.

त्यानुसार, त्यांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन कार, 18 दुचाकी, 27 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य आणि पाच लाख 33 हजार 610 रुपयांची रोकड, असा पस्तीस लाख 10 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास म्हाळुंगे पोलिस करीत आहेत.

Back to top button