वाल्हे : शेतकर्‍याच्या दारात बिबट्याचा ठिय्या | पुढारी

वाल्हे : शेतकर्‍याच्या दारात बिबट्याचा ठिय्या

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे बिबट्या नागरी वस्तीत येऊ लागला आहे. मंगळवारी (दि.2) रात्री बिबट्याने पिंगोरी येथील बाग वस्तीतील शेतकर्‍याच्या घरासमोर झाडीत रात्रभर ठिय्या दिला. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. या आधी बिबट्याने डोंगरात चरायला गेलेल्या पाळीव प्राण्यांवर अनेकदा हल्ला केला आहे.

गेली कित्येक वर्षे डोंगरी भागात वास्तव्यास असणारा बिबट्या आता गावात येऊ लागला आहे. मंगळवारी रात्रभर बिबट्याने घरासमोर ठिय्या दिल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. येथील तरुणांनी या बिबट्याचे व्हिडिओ चित्रण केले. दरम्यान, पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button