पुणे : अवघड शाळांचे निकष बदलले; जिल्हा परिषदेचा निर्णय | पुढारी

पुणे : अवघड शाळांचे निकष बदलले; जिल्हा परिषदेचा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील अवघड शाळा ठरवताना शासनाच्या सात निकषांऐवजी चार निकषांआधारे अवघड क्षेत्रातील शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या 929 क्षेत्रांवरून 355 अवघड क्षेत्रे निश्चित झाली आहेत. शासनाच्या निकषानुसार राज्यात सर्वाधिक अवघड शाळा यापूर्वी निश्चित करण्यात आल्या होत्या. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तीन हजार 639 शाळा आहेत. पुणे जिल्हा परिषदेने चार निकष लावल्याने 355 शाळा अवघड क्षेत्रात घोषित करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांनी काही महिन्यापूर्वी सॉफ्टवेअरमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारेच आपोआप बदल्या होणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेत यापूर्वी 929 अवघड शाळा होत्या. त्या कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वतः तीनऐवजी चार निकषांचा आधार घेत अवघड शाळांची पुनर्व्याख्या करून शाळांची संख्या निश्चित केली. त्यामुळे अवघड शाळांची संख्या आता घटली आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळांची संख्या ही गडचिरोलीपेक्षा जास्त झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. राज्य सरकारने सात एप्रिल 2021 च्या निर्णयाद्वारे अवघड क्षेत्रातील शाळांसाठीचे सात निकष निश्चित केले होते. त्या निकषांच्या आधारे अवघड क्षेत्रातील शाळांची निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांनी सरकारने ठरविलेल्या सातऐवजी तीन निकषांच्या आधारावर अवघड शाळांची निवड केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेने तीनऐवजी चार निकषांचा आधार घेऊन 928 वरून 335 अवघड शाळांची निवड केली आहे. त्यामुळे शिक्षकांचा फायदा होणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या ऑनलाइन सॉफ्टवेअरद्वारे आता शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्या बदल्या करण्यापूर्वी अवघड क्षेत्रांची नव्याने व्याख्या केली आहे. पूर्वी सातपैकी तीन निकषांनुसार अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित केल्या जात होत्या.

                           – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा

 

Back to top button