पुणे : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

पुणे : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत भरत अण्णा देवकर (वय 41, रा. वडारवस्ती, भाजी मंडई, येरवडा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी डंपरचालक रोहिदास राजाराम गोरे (वय 30, रा. लोहगाव) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी सीमा वळवी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास गेरा रोड (खराडी) परिसरात घडली. देवकर हे एका खासगी कंपनीत काम करीत होते.

मंगळवारी दुपारी ते दुचाकीवरून खराडीतील गेरा रोड परिसरातून निघाले होते. त्या वेेळी भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी या त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांसोबत हद्दीत गस्तीवर होत्या. त्या वेळी त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनावणे करीत आहेत.

Back to top button