तळेगाव स्टेशन : रेल्वे लोकल सेवा पुर्ण क्षमतेने होणे आवश्यक | पुढारी

तळेगाव स्टेशन : रेल्वे लोकल सेवा पुर्ण क्षमतेने होणे आवश्यक

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा:  लोणावळा – तळेगाव – पुणे रेल्वे लोकल सेवा पुर्ण क्षमतेने होणे आवश्यक आहे. मावळातून लोणावाळा पासुन तळेगाव पुणे पर्यंत विद्यार्थी, कामगार, कार्यालयीन कर्मचारी, व्यावसायीक, व्यापारी, आदी प्रवाशी अनेक कामासाठी पुण्याला मोठ्या संख्येने जात-येत असतात. परंतु सध्या रेल्वे लोकल सेवा पुर्ण क्षमतेने नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

आता लॉकडाऊन संपला आहे, निर्बंध उठलेले आहेत, प्रवाशांची संख्या वाढली असुन लोकल सेवा पुर्ण क्षमतेने नाही. कोरोना पार्श्वभूमीच्या अगोदर पुण्याला जाणा-या १८ आणि येणाऱ्या १८ अशा सुमारे ३६ लोकल होत्या. सध्या पुण्याला जाणा-या १३ आणि येणा-या १३अशा सुमारे २६ लोकल आहेत.

सध्या जाणा-या ५ आणि येणा-या ५ अशा सुमारे १० लोकल कमी आहेत. यामुळे अनेकांना इतर वाहनांनी जावे-यावे लागते. वेळ वाया जातो तरी पुर्ण क्षमतेने लोकल सेवा चालु करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

Back to top button