पिंपरी : एक लाख 67 हजारांचा महिलेला गंडा | पुढारी

पिंपरी : एक लाख 67 हजारांचा महिलेला गंडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  ऑनलाइन पेमेंटसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन केला असता महिलेच्या खात्यातून एक लाख 67 हजार 230 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 मार्च 2022 रोजी मोशी येथे घडली. याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 1) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ‘केक्स एन मोअर-ऑन केक डिलिव्हरी इन पुणे’ या वेब पेजवरील मोबाईल क्रमांकावर फोन केला. केकची ऑर्डर दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना फोन केला. केकचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आरोपीने त्यांना व्हाट्सअपवर पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनीं क्यूआर कोड स्कॅन केला असता त्यांच्या बँक खात्यातून एक लाख 68 हजार 230 रुपये ट्रान्स्फर करून फिर्यादीची फसवणूक केली. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

Back to top button