पिंपरी : सव्वा लाखाच्या विद्युत उपकरणांची चोरी | पुढारी

पिंपरी : सव्वा लाखाच्या विद्युत उपकरणांची चोरी

पिंपरी : कंपनीतील सव्वा लाख रुपये किमतीची विद्युत उपकरणे चोरून नेणार्‍या दोन कामगारांसह सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार एप्रिल 2022 पासून वेळोवेळी फ्लिपकार्ट प्रा. इंडिया लि. मोशी डार्क स्टोअर, टोल नाक्याजवळ मोशी येथे घडला.
जगदीश चन्नप्पा गौडशेट्टी (रा. भोसरी), सुरज राजू कांबळे (रा. मोशी), लक्षराज अरुण गुरव (रा. हिंदवी कॉलनी, देहू फाटा, पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी फ्लिपकार्ट कंपनीच्या मोशी डार्क स्टोअरचे व्यवस्थापक आनंद रामप्रसाद रतन (26, रा. मोशी) यांनी सोमवारी (दि. 1) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी हे फ्लिपकार्ट कंपनीच्या मोशी डार्क स्टोअर येथे कामाला आहेत. दरम्यान, आरोपींनी आपापसात संगनमत करून कंपनीतील एक लाख 27 हजार 715 रुपये किमतीच्या वेगवेगळी विद्युत उपकरणे चोरून नेली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Back to top button