पिंपरी : पैशांसाठी विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : पैशांसाठी विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : माहेरहून पन्नास लाख रुपये आणि सात तोळे सोने आणण्याची मागणी करीत सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, मुलाचे दुसरे लग्न लावून देण्याची वारंवार धमकी देखील दिली. हा प्रकार अंबिका पार्क, वतननगर, तळेगाव स्टेशन येथे घडला. याप्रकरणी 38 वर्षीय विवाहित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सुनील रवींद्र दाभाडे, सासरे रवींद्र शंकर दाभाडे, सासू रंजना रवींद्र दाभाडे, दीर दुष्यंत रवींद्र दाभाडे आणि गायत्री दुष्यंत दाभाडे (सर्व रा. अंबिकानगर, वतन पार्क, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे फेब्रुवारी 2021 मध्ये आरोपी सुनील दाभाडे याच्याशी लग्न झाले. दरम्यान, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेचा घरातील छोट्या गोष्टीवरून छळ करण्यास सुरुवात केली. तसेच, विवाहितेला अपमानास्पद बोलून मारहाण देखील केली. आरोपी पतीने विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ढकलून दिले. ‘माहेराहून पन्नास लाख रुपये आणि सात तोळे सोने आण, नाहीतर तुझा या घराशी काहीएक संबंध नाही, तुला मला नांदवायचे नाही, मला दुसरे लग्न करायचे आहे’, असे म्हणून पतीने त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

Back to top button