पुणे: कसबा पेठ मतदारसंघात 28 लाख रुपये जप्त

पुणे: कसबा पेठ मतदारसंघात 28 लाख रुपये जप्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने 13 हजार 542 वाहनांची तपासणी केली. या दरम्यान, नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये 28 लाख 18 हजार 500 इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली.

कसबा पेठ पोट निवडणुकीच्या प्रचारास शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी 6 वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news