मावळात पर्यटकांची गर्दी | पुढारी

मावळात पर्यटकांची गर्दी

तळेगाव स्टेशन : मावळ परिसरास निसर्ग सौंदर्याची वरदान लाभले असून लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवनानगर येथे राज्याच्या कानाकोपर्‍यातून अनेक पर्यटक येत आहेत. पर्यटनस्थळावर गर्दी होत असल्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटक वडेश्वर, खांडीसावळा येथेही आकर्षित होत असून, धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत आहेत. तसेच, श्री घोरावाडीश्वर डोंगर, श्री चौराईमाता डोंगर परिसर, श्री हरणेश्वर टेकडी, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर परिसर, तळेगाव, उर्से, कुंडमळा आदी ठिकाणीही निसर्गाचे वरदान असून तेथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना खुणावत आहे.

मावळातील पर्यटनस्थळी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. यातच काही अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानीची घटनाही घडल्या आहेत. पावसामुळे डोंगरवाटा, तलाव परिसर, नदीकाठचा परिसर निसरडा झाला असल्याने त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

Back to top button