पिंपरी : साबुदाणा खिचडी महागली | पुढारी

पिंपरी : साबुदाणा खिचडी महागली

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: श्रावण महिना सुरू झाल्याने भजी आणि वडापावऐवजी सर्व हॉटेल्स आणि मेसमध्ये साबुदाणा खिचडीची मागणी ग्राहकांकडून होत आहे. मात्र दुकानदारांनी साबुदाणा आणि शेंगदाण्याचे दर वाढविल्याने हॉटेल्स चालकांनीही खिचडीचे दर वाढविले आहेत. एरवी पहाटे पहाटे शाळा, कॉलेज आणि कामावर जाणारी मंडळी गरमा गरम भजी, आणि वडापाववर ताव मारायची, मात्र श्रावण सुरू झाल्याने बरेच नागरिक साबुदाणा खिचडीची मागणी करीत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

मात्र खिचडीच्या दरात काही विक्रेत्यांनी पाच ते सात रूपये दर वाढविले आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी व आकुर्डी येथील शाळा महाविद्यालयीन परिसरात मोठ्या प्रमाणात नाष्टा सेंटर आहेत. भजीपाव, वडापावची मागणी कमी झाल्याने सकाळी साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, अशी उपवासाची डिश बनविली जात आहे. मात्र दरात वाढ झाल्याची माहिती विचारता किराणा दुकानदारांकडून साबुदाणा आणि शेंगदाण्याचे दर वाढविण्यात आले आहेत.

किरकोळ नाष्टा सेंटरमधून दिवसाला 5 ते 7 किलो साबुदाणा खिचडीचा होतोय खप

उपवासाचे जिन्नस    पूर्वीचे दर (किलो)     आताचे दर (किलो)
साबुदाणा                       70                               80
शेंगदाणा                       115                            130
साबुदाणा खिचडी           20                             30-35

श्रावण सुरू झाल्याने साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडीची ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. मात्र किराणा दुकानांमधून साबुदाणा आणि शेंगदाण्याचे दर वाढविण्यात आल्याने प्लेटमागे पाच ते सात रूपये वाढविले आहेत.

                                                                   – सुरेश चौधरी, हॉटेल व्यावसायिक

Back to top button