महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

‘शिवाजीनगर’मध्ये आघाडीचे आव्हान

Published on

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप निवडून आला असला, तरी या वेळी किमान दोन-तीन प्रभागांत विरोधक त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी झाल्यास तेथे तुल्यबळ लढती पाहण्यास मिळतील. मिश्रवस्ती असलेल्या या मतदारसंघात भाजपने गेल्या वेळी अनपेक्षितपणे आघाडी मिळविली होती. महाविकास आघाडी एकसंधपणे लढल्यास प्रभाग दहा, अकरा व पंधरा या तीन प्रभागांत भाजपला कडवी टक्कर देण्याच्या स्थितीत आहेत.

त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या प्रभाग बारातही एखाद-दुस-या जागेवर चुरशीची लढत होईल. भाजपने गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातील तिन्ही प्रभागांतील बारा जागा जिंकत शतप्रतिशत भाजप ही घोषणा सार्थ केली होती. त्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे भाजपकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे.

अटीतटीची लढत
प्रभाग दहामध्ये (शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी) दोन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. भाजपकडून हरीश निकम, समाधान शिंदे, ज्योत्स्ना एकबोटे, रवीराज यादव, राहुल शिरोळे आदींची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब बोडके, राजू साने, शिवसेनेकडून राजू पवार, काँग्रेसकडून तात्या कोंडे, राहुल भोसले यांची नावे आघाडीवर आहेत. या प्रभागात आमदार अनिल भोसले यांच्या समर्थकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भोसले यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले, मुलगा जय भोसले निवडणुकीत उतरणार आहेत का, लढणार असल्यास ते भाजपकडून की राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. काहीही झाले, तरी प्रभागाची रचना बदलल्यामुळे यंदा येथे अटीतटीची लढत पाहण्यास मिळेल.

महाआघाडीचे आव्हान
प्रभाग अकरामध्ये (बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण अशा तीन जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाला येथे एक जागा दिली होती. या वेळी प्रकाश ढोरे, सुनीता वाडेकर हे नगरसेवक, तसेच आनंद छाजेड यांच्या पत्नी यांची नावे भाजप-रिपब्लिकन पक्षाकडून आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील, सुलभा निरभवणे, अर्चना कांबळे, नितीन कांबळे, काँग्रेसकडून मनीष आनंद, शैलजा खेडेकर यांची नावे चर्चेत आहेत. गेल्या निवडणुकीत या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यामुळे, भाजपचा फायदा झाला होता. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षा अधिक होती. यंदा दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास, ते भाजपपुढे आव्हान उभे करू शकतील.

भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष
प्रभाग बारामध्ये (औंध-बालेवाडी) भाजपकडून अमोल बालवडकर, सनी निम्हण, दत्ता गायकवाड, बाळासाहेब रानवडे, स्वप्नाली सायकर, अर्चना मुसळे, विद्या लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, शारदा पुनवळे, सचिन मानवतकर आदींची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. सागर बालवडकर, अशोक मुरकुटे, समीर चांदेरे, विशाल विधाते, शीला भालेराव, काँग्रेसकडून कैलास गायकवाड, स्नेहल बांगर, अदिती गायकवाड, शिवसेनेकडून संजय निम्हण, संतोष तोंडे आदींची नावे आहेत. महाविकास आघाडी झाल्यास, जागावाटप महत्त्वाचा मुद्दा ठरेल. या व लगतच्या प्रभागात मुख्य लढत ही भाजप व राष्ट्रवादी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. या प्रभागात शिवाजीनगरबरोबरच कोथरूड मतदारसंघातीलही भाग समाविष्ट झालेला आहे.

विधानसभा निवडणुकीची तयारी
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मिश्रवस्ती असलेला शिवाजीनगर मतदारसंघ महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकीत भाजपने खेचून घेतला. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांतील मताधिक्याचा फरक पाच हजारांपर्यंत होता. भाजपने 2017 मध्ये महापालिकेच्या सर्व जागा जिंकल्या. आमदार सिद्धार्थ शिरोळे गेले वर्षभर मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांचे गेल्या वेळचे विरोधक काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनीही मित्रपक्षाच्या मदतीने भाजपला रोखण्याची व्यूहरचना आखली आहे. आगामी महापालिका निवडणूक पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही तयारीची ठरणार आहे. हवालदार ए. जी. पाटील तपास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news