निरा : कपलिंग तुटले; मालगाडी एक कि.मी. गेली पुढे | पुढारी

निरा : कपलिंग तुटले; मालगाडी एक कि.मी. गेली पुढे

निरा; पुढारी वृत्तसेवा: निरा (ता. पुरंदर) येथील रेल्वेस्थानकावर पुण्याहून मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने गार्डचा मागील भाग पाठीमागे पिंपरेत राहिला, तर इंजिनचा भाग एक कि.मी. पुढे निरा रेल्वे स्थानकापर्यंत दाखल झाला. मालगाडी काही अंतरावर गेल्यावर ही घटना उघडकीस आली. रविवारी (दि. 31) सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीची ही घटना निरा-पिंपरे खुर्द लोहमार्गादरम्यान घडली.

रविवारी (दि. 31) सायंकाळी पुण्याहून मालगाडी निरेहून पुढे जात असताना रेल्वेच्या दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. अर्धी रेल्वे (गार्डचा भाग) पिंपरे खुर्द येथील फाटकात उभी राहिली, तर अर्धी रेल्वे (इंजिनकडील अर्धा भाग) निरा रेल्वेस्थानकात आला. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुढे गेलेला इंजिनचा भाग माघारी आणून हे दोन्ही रेल्वे भाग जोडले. कपलिंग तुटलेले मालगाडीचे डबे ऑटोमॅटिक ब्रेक लागून जागेवर उभे राहिले. त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही तसेच रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही. रेल्वेगाड्यांबाबत वारंवार घटना घडू लागल्याने रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

Back to top button