पुणे : श्रावणामुळे फळांना मागणी | पुढारी

पुणे : श्रावणामुळे फळांना मागणी

पुणे : सण-उत्सवांचा श्रावण महिना सुरू झाल्याने बाजारात फळांना मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने खरबूज, पपई व लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. लिंबाचे भाव 15 किलोंच्या गोणीमागे 50 ते 70 रुपयांनी, तर खरबूज व पपईचा भाव किलोमागे चार ते पाच रुपयांनी वधारला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक वाढली आहे.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 200-500, मोसंबी : (3 डझन) : 80-250 (4 डझन) 20-100, डाळिंब (किलो) : भगवा : 30-140, गणेश : 10-25, आरक्ता 10-60. कलिंगड : 3-10, खरबूज : 10-25, पपई : 5-30, पेरू (20 किलो) : 400-600, चिकू : 500-600, सीताफळ : 25 ते 200.

फळे किरकोळ भाव
(प्रतिकिलो)
सफरचंद 200-240
डाळिंब 180-250
संत्रा 120-140
मोसंबी 100-120
चिकू —
पेरू 60-70
सीताफळ 100-150
आंबा 200
(प्रति नग)
पपई 60-80
खरबूज 50-60
अननस 50-80
कलिंगड 50-60

Back to top button