कार्ला परिसरात पर्यटकांची गर्दी | पुढारी

कार्ला परिसरात पर्यटकांची गर्दी

कार्ला : पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कार्ला परिसरात असणार्‍या भाजे लेणी, कार्ला लेणी, एकवीरा देवी मंदिर, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, भाजे धबधब्यावर पर्यटकांची झाली गर्दी होती. परंतु, अनेक दिवसांपासून पाऊस व धबधब्याला पाणी नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता.

कार्ला परिसरात पावसाच्या विश्रांतीमुळे भाजे येथील सुप्रसिद्ध धबधब्याला पाणी नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. भाजे धबधब्यावर वर्षाविहाराचा आनंद घेता न आल्याने पर्यटकांनी भाजे लेणी व लोहगड, विसापूर किल्याकडे आपला मोर्चा वळवला होता. भाजे लेणी पर्यटकांनी फुलून गेली होती. तर, लोहगड व विसापूर किल्याकडे जाणार्‍या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी झाली होती.

Back to top button