पिंपरी : दिवसभरात 1 लाख 80 हजार अभिलेख डाऊनलोड | पुढारी

पिंपरी : दिवसभरात 1 लाख 80 हजार अभिलेख डाऊनलोड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागासाठी ‘एनआयसी’कडून विकसित केलेल्या महाभूमी पोर्टलवरून शुक्रवारी (दि. 30) एका दिवसात 1 लाख 37 हजार नागरिकांनी 1 लाख 80 हजार डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख डाऊनलोड केले. या मध्ये 1 लाख 24 हजार डिजिटल स्वाक्षरीत 7 / 12, 47 डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे (8अ), 3100 डिजिटल स्वाक्षरीत फेरफार, 5 हजार 200 डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका यांचा समावेश असून एका दिवसात सर्वाधिक सुमारे 31 लक्ष रुपये नक्कल फी जमा झाली.

हा गेल्या अडीच पावणेतीन वर्षातील उच्चांक आहे. महाभूमी पोर्टल या सेवेतून डिजिटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख मिळविण्यासाठी  लॉगिन करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केले आहे.

 

Back to top button