पिंपरी : महिलेची चेन हिसकावली | पुढारी

पिंपरी : महिलेची चेन हिसकावली

पिंपरी : तूप विक्रीच्या बहाण्याने चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी विनायक नगर, नवी सांगवी येथे घडली. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या राहत्या इमारतीचा जिना झाडून घेत होत्या. त्यावेळी चोरटा तेथे आला. त्याने फिर्यादी यांना तूप घेता का, असे विचारले.

त्यावर फिर्यादी यांनी नकार दिला. त्यांनतर आरोपीने तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन (बोरमाळ) दाखवा. मला माझ्या आईला अशीच बोरमाळ करायची आहे, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी पदर बाजूला करून बोरमाळ दाखवली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 80 हजारांची बोरमाळ हिसका मारून तोडून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button