पिंपरी : कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणाचा खून

पिंपरी : कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणाचा खून
Published on
Updated on

पिंपरी : कानाखाली मारल्याच्या रागातून दहा जणांनी मिळून तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. तसेच, मयत तरुणाच्या मित्रावरदेखील खुनी हल्ला चढवला. ही घटना गुरुवारी (दि. 28) सायंकाळी वाकड गावठाण येथे घडली. दीपक भगवान गायकवाड उर्फ खंडू असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तर, लखन लगस याच्यावर खूनी हल्ला केला आहे. याप्रकरणी आदित्य अशोक थोरात (19, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सुमित सावंत, अमोल देशमुख, अभिषेक उर्फ नंदू कांबळे, सुजीत लोंढे, आशिष भिसे उर्फ मर्फी, ब्रह्मा जाधव, महेश जाधव, उत्कर्ष जाधव, सौरव जाधव (सर्व रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुजीत लोंढे याला खंडू आणि लखन यांनी मारले होते.

त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्या कारणावरुन आरोपींनी थांबा तुमची विकेटच टाकतो, असे म्हणून खंडूच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केला. तसेच, लखन लगास याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी परीसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news