दापोडीतील पवना घाटावर अस्वच्छता | पुढारी

दापोडीतील पवना घाटावर अस्वच्छता

दापोडी : येथील पवना घाटावर असलेल्या मवलाई देवस्थान व म्हसोबा देवालय या ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे. या घाटावर टवाळखोर दिवसा व मध्यरात्री मद्यपान प्राशन करीत आहेत. त्यामुळे आरोग्य व पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांच्यावतीने करण्यात येत आहे.

आषाढ व श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. दापोडी, फुगेवाडी परिसरातील अनेक महिला येथे दर्शनासाठी मनोभावाने येतात. मात्र, या ठिकाणी भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बॉम्बे कॉलनीतून येणारे ड्रेनेजचे पाणी थेट देवालयासमोरुन नदी पात्रात सोडण्यात येत आहे. तसेच, भाविकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. देवालय परिसरात प्लॅस्टिकचे कागद, बाटल व तसेच मद्याच्या बॉटल दिसून येत आहेत.

त्यामुळे भाविकांनी या ठिकाणी दर्शनाला यायचे का नाही हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे भाविकांना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने पवना घाटावर टवाळखोर मद्यप्राशन करणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडफन केली जात आहे.

Back to top button